तुज स्वप्नात रंगले
तुज स्वप्नात रंगले
1 min
336
आवरे ना सावरे हे
मन असे बेभानले
निद्रेत ना जागेपणीही
तुज स्वप्नात रंगले............
बेबंद झाल्या भावना
धुंद वारे सुसाटले
कळे ना काही कळूनही
तुज स्वप्नात रंगले...........
धुंदवेड्या चांदणीला
नभाने आज व्यापले
पाहते ना पाहता मन
तुज स्वप्नात रंगले.........
गंधाळले श्वास सारे
स्तब्ध बेहोष जाहले
अधीर होता भावबंध
तुज स्वप्नात रंगले...........
धुंदला केवडा अन्
रंग धरचे गंधले
चालरीत विसरून ही
तुज स्वप्नात रंगले............
सळसळणारे पान हे
अलवार कानी गुजले
मीच माझी राहिले ना
तुज स्वप्नात रंगले..........
उंबरा आड येई ना
वारे जरी उधाणले
विसरले सारेच आता
तुज स्वप्नात रंगले...........
