टु गो... ऑर... नॉट टु गो...
टु गो... ऑर... नॉट टु गो...
1 min
164
कुठे जायचं चालायचं तर
येऊ लागलंय फार जिवावर..
संबंध येणार असेल पुलाशी
जास्तच धडकी हृदयापाशी..
आपल्या जिवावर बेतेल कधी
सांगू शकत नाही कुणी कधी..
पुलावरून चालायचं असेल जर
पूल खाली कोसळायची भीती..
पुलाखालून चालत असलो तर
पूलच अंगावर पडायची भीती!
