ठोकळे
ठोकळे
1 min
170
बांध तो कसला
आपोआप फुटला
जपले अडविले
यातनांनी रडविले
मी काहीच नाही
पुढची वाट पाही
कसले मन मोकळे
बसले सारे ठोकळे
खोटे हसणे आवरणे
समोरच्याला डावळणे
बैठकीत जमा सर्व
सांभाळीत गर्व
चांगल म्हणायचे अस
जमेल जस जस
गुटमळती खोटेपणा
मिरवीत अतिशहाणपणा
