STORYMIRROR

krishnakant khare

Others

2  

krishnakant khare

Others

" *तसे आम्ही सौजन्याचे पुतळे

" *तसे आम्ही सौजन्याचे पुतळे

2 mins
234

  " *तसे आम्ही सौजन्याचे पुतळे*।

*पक्षा पक्षातील आमचे रंग वेगळे*।" 

  

       " तसे आम्ही सौजन्याचे पुतळे।

पक्षा पक्षातील आमचे रंग वेगळे।।"

ज्याची झाली कामगिरी महान।

त्याचे पुतळे चौकाचौकात होती विराजमान।।

मी पक्षी कावळा, मी पक्षी कबूतर।

कधी बसेन पुतळ्याच्या डोईवर।।

कधी घाण करेन पुतळ्याची डोईवर।

" तसे आम्ही सौजन्याचे पुतळे।

पक्षा पक्षातील आमचे रंग वेगळे।।

कधी का काळजीअसते? त्या पुतळ्यावरच्या पक्षांना।

कधी का काळजीअसते? त्या राजकारणातल्या पक्षांना।।

तसे आम्ही सौजन्याचे पुतळे।

पक्षा पक्षातील आमचे रंग वेगळे।।

मग पुतळ्याच्या डोक्यावर असो ,

कि मग चिकन ड्रिंक ची पार्टी असो।

पक्षी काय किंवा पक्ष काय?

बसतील तिथेच घाण करतील!।।

तसे आम्ही सौजन्याचे पुतळे।

पक्षा पक्षातील आमचे रंग वेगळे।।

पांढरे डगळे घालून आम्ही होतो राजकारणातील नेते,

तरी म्हणु नका आम्हाला राजकारणातील बगळे ।

आणि काळे डगळे घालून होतं आम्ही कायद्यातील केवळे,

तरी म्हणु नका आम्हाला काळ्या डगळातील कावळे।।

म्हणून काय आम्ही काव काव ,

किंवा म्या म्या नाही करत।

दोघांतील विचार एकच सारखा।

मतांसाठी होतो आम्ही राजकारणी लाचार हमाल।

न्यायासाठी, होतो आम्ही न्यायिक वैचारिक

हमाल ।।

न्यायदेवतेच्या डोळ्यावर बांधला असतो न्याय अन्यायाचा रुमाल।

राजकारणासाठी जनता देवता असते।

कायद्यासाठी मायबाप न्याय देवता असते।।

तसे आम्ही सौजन्याचे पुतळे।

पक्षा पक्षातील आमचे रंग वेगळे।।

कोणी कितीही थोर झाला

तरी त्याचे पुतळे सुरक्षित राहतील याची काय शाश्वती?।

डोक्यावर कावळा बगळा बसण्या अगोदर त्या पुतळ्याची डोकी सुरक्षित राहतील ह्याची घ्या ग्यारंटी।।...2

तसे आम्ही सौजन्याचे पुतळे।

पक्षा पक्षातील आमचे रंग वेगळे।।

स्टोरी मिरर कविता स्पर्धा

   " तसे आम्ही सौजन्याचे पुतळे।

पक्षा पक्षातील आमचे रंग वेगळे।"


काही पक्षातील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी

आपआपल्या नेत्यांचे पुतळे चौकाचौकातील चौकटस्तंभाला लावतात, पण तर त्या पुतळ्याची अवस्था असते की त्या पुतळ्याचे हाल पाहवत नाही.समाजातातुन बरेचण तो विषय समजत असुन कानाडोळा करतात

मग ते कसे तेच कवितेच्या रुपाने लिहण्याचा प्रयत्न.



Rate this content
Log in