STORYMIRROR

krishnakant khare

Others

2  

krishnakant khare

Others

*" प्रेमात प्रेम अती प्

*" प्रेमात प्रेम अती प्

3 mins
189

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा,*

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।*

*अती लाड (प्रेम)करू नका ना माझे आईबाबा*,

*तुमच्या लाडाने मी खराब(हट्टी)झालो तर*,

*तुमच्या पांगेचा(उपकाराचा) कसं होईन उतराई*।।.....

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा,*

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।*

*हे मना माझं बोलण्यावर अति प्रेम देऊ नकोस, नाहीतर म्हणतील मला बाताड्या।।*......

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा*,

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।*

*हे मना मला सदा गप्प राहण्याला अती प्रेम देऊ नकोस,*

*नाहीतर म्हणतील मला चुप्पाड्या*।।.....

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा*,

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।*

*हे मना माझं पिण्यावर अति प्रेम नको देऊस,*

*नाहीतर म्हणतील मला बेवडा।।*......

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा*,

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।*

*हे मना माझं खाण्यावर अती प्रेम देऊ नकोस, नाहीतर म्हणतील मला खादाड्या।।*......

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा,*

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।*

*हे मना माझं खोटं बोलण्यावर अती प्रेम देऊ नकोस रे*

*नाहीतर खोटार्ड्या मला म्हणतील रे।।.....*

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा,*

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।*

*हे मना मला दुसर्यावर अती विश्वास ठेवण्याचा अती प्रेम देऊ नकोरे,*

*नाही तर माझं विश्वासघात होण्यापासून कोणी रोखु शकणार नाही रे।।......*

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा*,

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।*

*हे मना मला अती घाईचा अती प्रेम देऊ नकोरे,*

*नाही तर मला जीवसंकटातून कोण वाचवील रे? (अती घाई संकटात नेही)।।......*

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा,*

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।.....*

*हे मना मला धुम्रपानाचा अतीप्रेम देऊ नकोरे ,*

*नाहीतर मला दु:खी मरणापासुन कोण वाचवील रे ।।.....*

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा,*

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।*

*हे मना मला अती मोबाइल वापराचा अतीप्रेम देऊ नकोरे,*

*नाहीतर माझं जीवन भरकटण्याला कोण वाचवेल रे।।....*

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा,*

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।.....*

*हे मना मला प्रत्येक गोष्टी संयमाने होण्यासाठी संयमाने प्रेम दे,*

*पण अतीप्रेम देऊ नकोरे,*

*नाहीतर माझं भविष्य धुळीस मिळण्यास कोण वाचवु शकणार रे।।.....*

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा,*

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।.....*

*हे अती प्रेमाचे वाईट परिणाम*

*खोटे करण्याचा प्रयत्न करण्यार्याला त्याचे जीवन खोटे करण्याला कोणीच वाचवु शकणार नाही रे।।...*

*प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा,*

*त्या परिणामाचा वचपा कधी निघेल, सांगता येत नाही रे बाबा।....*

*" प्रेमात प्रेम अती प्रेम नको रे बाबा,*।।.....

हि कविता लिहताना..✍ जगात आईवडीलांशिवाय दुसरे कोणतेच जीवंत दैवत असु शकत नाही, भाग्यवान जो झाला त्याला आईबाबांची सेवा करायला मिळाली हि सत्यता कोणीच नाकारू शकत नाही तसेच

प्रेमात प्रेम

अती प्रेम किती,कसा? वाईट असतो हे कविता वाचल्यावरच लक्षात येतं. तेच लिहण्याचा छोटासा प्रयत्न पण हयात दोन कविता लिहुन झाल्या असत्या पण कवी मन जागृत झालं कि कवितेची हनुमानाची शेपटी कशी वाढेल सांगता येत नाही. आपल्या मी लिहलेल्या कवितेत प्रेम विषय असल्याने माझ्या प्रत्येक कवितेत वेगळपण   साहजिकच आलेय म्हणून प्रिय वाचकांना वाचायला मस्तच वाटेल।

Rate this content
Log in