असावे सगळ्यांवर प्रेम,मग का नस
असावे सगळ्यांवर प्रेम,मग का नस
असावे सगळ्यांवर प्रेम, मग का नसावे पक्षांवर प्रेम? ....
मी एक पक्षाचे मन व्हावे,
पक्षांच्या थव्यातून अथंग विहरत जावे।...
मुक्तछंद विहरत जावे
विहरत जावे ,विहरत जावे....
असावे सगळ्यांवर प्रेम, मग का नसावे पक्षांवर प्रेम?....
का, कोणी शक घेतलं जातं आमच्या पारव्याच्या जोडीला?...
का आमचं उडणं जगणं बंद केलं जातं पारव्याच्या जोडीला?...
असावे सगळ्यांवर प्रेम, मग का नसावे पक्षांवर प्रेम?..
म्हणे आमच्या संघ उडण्याला,....
श्वासाचा त्रास होतो सर्वांना,....
कधी शिकार होऊ पारध्याला।...
जीवन पुर्ण होत नाही,
जीव जातोय अर्ध्याला।..
असावे सगळ्यांवर प्रेम, मग का नसावे पक्षांवर प्रेम?..
न्यायदेवता फक्त मानवालाच का असावी?..
आम्ही कोणाचं घोडं मारलं? मग आम्हालाच का नसावी?...
असावे सगळ्यांवर प्रेम, मग का नसावे पक्षांवर प्रेम?
मांज्याची दोरी
सगळ्यांनाच भारी,..
कोणाचा गळा कापतो,
तर कोणाचा पंखांना भारी।....
कधी कधी पक्षांवरही प्रेम करावे,...
उरले सुरले आयुष्य सत्कारणी लावावे।....
असावे सगळ्यांवर प्रेम, मग का नसावे पक्षांवर प्रेम?..
प्रेमप्रतिक असणार्या कबुतराला,
माज्यांपासुन वाचवावे,...
मुक पशु पक्षींची दया
आपण जाणावी,
आपण जाणावी।।
असावे सगळ्यांवर प्रेम, मग का नसावे पक्षांवर प्रेम?..
" प्रेम " या वर कविता
आपण प्रेमापोटी पक्षांला पाळतो पण जे पाळीव असतात तेच,
ज्यावेळी लळा लागतो मग तो पाळीव प्राणी असो की पाळीव पक्षी त्याला काहीही ईजा झाली की आपण आपल्यांमुलांची इतकी काळजी घेणार नाही ईतकी काळजी त्या पशूपक्षीची घेतो, त्यावर आपला जीव गुंतल्याने मग आपण त्यासाठी काहीही करायला तयार होतो,मग ते प्रेमच असे असते की
मग पक्षांवर का असु नये प्रेम,
असं आपल्याला वांरवार वाटायला लागतं.
