" असंच असतं प्रेम, ह्याला शब्दच अपुरे असतं।।.....
" असंच असतं प्रेम, ह्याला शब्दच अपुरे असतं।।.....
आईला आपला बाळ,आपला बाळच सोनुल्या असतो,
मायेची ममताच ती।
असंच असतं प्रेम ह्याला शब्दच अपुरे असतं।।.....
बाबांना आपला बाळ,आपला बाळच लाडका असतो,
पितृत्वाचा वसाच तो।
असंच असतं प्रेम, ह्याला शब्दच अपुरे असतं।।.....
बहिणीला आपला भाऊ,आपला भाऊच प्रिय असतो,
बहिणीची मायाच ती।
असंच असतं प्रेम ह्याला शब्दच अपुरे असतं।।.....
भावाला आपली बहिण,आपली बहिणच प्रिय असते,
जीवाभावाचा बंधूच तो।।
असंच असतं प्रेम, ह्याला शब्दच अपुरे असतं।।.....
भावाला आपला भाऊ,
आपला भाऊच प्रिय असतो,
ते असते बंधु प्रेम।
असंच असतं प्रेम, ह्याला शब्दच अपुरे असतं।।.....
मित्राला आपला मित्र,आपला मित्रच प्रिय असतो,
हि झाल़ी मैत्री प्रेम।।
असंच असतं प्रेम ह्याला शब्दच अपुरे असतं।।.....
नात्यातलं नातं ,
नातच प्रिय असते
हे असते नातेप्रेम।।
असंच असतं प्रेम, ह्याला शब्दच अपुरे असतं।।.....
जाती धर्मा पलीकडेही प्रेम असते,
विश्वबंधुता गजर आपला,
भारतदेशात ते बघायला मिळते।
असंच असतं प्रेम, ह्याला शब्दच अपुरे असतं।।.....
देशवासियांना आपल्या देशावर ,आपल्या देशावरच निष्ठा असते।
असंच असतं प्रेम, ह्याला शब्दच अपुरे असतं।।.....
.
हि कविता लिहताना म्हणजे प्रेम विषय असल्याने पण प्रेम विषयाला धरून नात्यातील प्रेमाची गुंफन करीत जातीधर्मापलिकडे प्रेमभाव असुन देशावर देशवासियांचें प्रेम असते पण अशाच निस्वार्थी प्रेमाला कौतुक करायला शब्दच अपुरे पडतात.