STORYMIRROR

krishnakant khare

Others

3  

krishnakant khare

Others

प्रेमा विना,* *लोभ गेले*,

प्रेमा विना,* *लोभ गेले*,

1 min
295


*प्रेमा विना ,लोभ गेले*

*लोभा विना आपलेपणा गेले।*

*आपलेपणा विना कुटुंब गेले।।*

*कुटुंब विना समाज गेले।*

*समाजाविना धर्म गेले।।* *

*देश गेले,सगळे हवालदिल झाले।*

*इतके अनर्थ प्रेमाच्या अभावाने झाले।।*

*म्हणूनी धर्माधर्मात द्वेष नसावा,*

*आपल्या आपल्यात प्रेमाचा ओलावा असावा।।*

*काही गैरसमज असेल,*

*तो प्रेमाच्या समजुतीने दुर व्हावा।।*

*हाताची पाची बोटे सारखी नसतात,*

*तरीपण एकदुसर्याला मिळून असतात।।*

*प्रेमाची गोष्ट पण तशीच असते,*

*जे दुसर्याचे दोष दाखवून काहीच साध्य होत नसते।।*

*तेच कामे न होणारी प्रेमाने साध्य होतात।।।*

*द्वेष करुनी कामे का साध्य होतात?,*

*तेच कामे न होणारी प्रेमाने साध्य होतात।।*

*प्रेम एक वेळ अमृत आहे,*

*प्रेम एक वेळ संजीवनी बुटी आहे।।*

*ज्याने प्रेमाने समाजात एकता साधली,*

*त्याने देशात एकता साधली।।*

*जे काही नाही साधलं* ,

*ते एका प्रेमाने साधलं।।*

*अशी प्रचिती येईल जेव्हा प्रेमाची,*

*एक एक पायरी चढु तेव्हा समाजसमृद्धिची।।*

हि कविता लिहताना..✍

जेंव्हा जीवनात कुणाचा अधोगति यायला लागते,त्यावेळी माणसाला काहीही सुचत नाही पण जर त्यानी आत्मनिरक्षण केले तर त्याला त्याच उत्तर अवश्य सापडते आणि ते म्हणजे कोणताही ईगो न ठेवता हुशारीने,प्रेमाने काम केले तरच.....।त्यासाठी हि कविता समजून घेणे आवश्यक वाटावी ह्याच हेतूने लिहली गेली आहे.

 धन्यवाद


Rate this content
Log in