STORYMIRROR

krishnakant khare

Others

3  

krishnakant khare

Others

*" सदा असावे प्रेम आधी भारतदेश

*" सदा असावे प्रेम आधी भारतदेश

2 mins
232

मला आहे धर्मावर प्रेम,

मला आहे धर्मावर प्रेम'

मग दिसेल कसं सर्वश्रेष्ठधर्म प्रेम?

मी करतोय दुसर्या धर्माची असुया, 

मग मिळेल फंड देशातनं दुसर्या।

मी करू का तुमच्या धर्मावर टिका?

मी घेतलाय दुसर्या देशातनं ठेका।

मग होणार नाही माझा धर्म परागंदा।

पुर्वजांनी दिला एकतेचा वसा,

क्षणात विसरून जाऊ खरा,

आपण स्वार्थी धर्माचे भाऊ,  

आपण धर्मासाठी खुशाल शेण खाऊ।

आपण स्वार्थासाठी खुशाल बदनाम करु लोका,

तुमचं,आमचं काय गेलं?बाहेरनं देशातून मिळतील नोटा।

पण जेंव्हा आज ना कधी कळेल आपली स्वार्थी भावना 

पण तेव्हा भारत देशातला, कोण माफ करील आपल्याला,

मी बुडालो,

माझा धर्म बुडाला,

सगळ्यांच्या नजरेतून उतरलो ,

मी माझ्या स्वार्थीपणामुळे,

बाहेरच्या स्वार्थी लोकांमुळे।

नको हे स्वार्थीपणाचे जीने मला,

भारताचा जबाबदार नागरिक व्हायचे मला।

माझा धर्म श्रेष्ठ या शर्यती साठी दुसर्या धर्माला का बदनाम करू?....

माझ्याच धर्माच्या बुडातला किती अंधारात ठेवू।

तेच दूर करण्याचा प्रयत्न करू।।

मला हवेत शिवछत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर,महात्मा गांधीजी या साठी जीवाचं रान करू ,

पण भारत देशात हिंदू मुस्लिम सिख ईसाई साठी राष्ट्रीय एकता साधु।

धर्माधर्माचे भांडवल करण्यार्यावर कडक वचक ठेवू।।

भारत देश हाच धर्म आपला,

जो या देशासाठी कामी आला,

तोच या जीवनी सफल झाला।

प्रेम आहे आम्हाला आमच्या देशावर,

नकोच कुठले कुटिल कारस्थान,

बाहेरच्या षढयंत्राने धर्माधर्मात नको तेडापण,

जे प्रेमाने साध्य होईल,

ते तेडापणानी नाही।

आली समज आम्हांला,

ती समज आपल्या समाजाला पण येईल।

जेव्हा भारतात एकता साधेल ,

तेव्हाच भारतात विश्वबंधुता नांदेल।

कोणी नाही निराळा भारतदेशात ,

कायम ठेवा विश्वबंधुता भारतदेशात।

तुम्ही भारतीय आधुनिक पिढीचे शिलेदार, 

जोपासा पुर्वजांचे एकतेचे सुखीसार।

सदा असावे प्रेम आधी भारतदेशावर,।

सदा असावे प्रेम आधी भारतदेशावर,।।


सदा असावे आपले प्रेम आधी भारत देशावर

दिवसंदिवस आपल्या भारत देशामध्ये ऊठसुट कोणी येतो आणि आपापल्या धर्माबद्दल तर वाईट-साईट बोलतो पण हेच पंधरा-वीस वर्षांपूर्वी असं कोणी भारत देशा बद्दल धर्माबद्दल बोलताना आढळत नव्हता पण आता येणाऱ्या पिढीला आपणच भारत देशाविषयी धर्माविषयी चांगली माहिती दिली नाही तर आताची पिढी दिशाहीन होईल मग आपल्या भारतीय एकतेला मोठी समस्या होईल या समस्यां नाही होण्यासाठी आपणच आपल्यापासूनच जागृत ठेवून प्रत्येकाने आपापल्या धर्माचा अभ्यास करून सगळ्यांसमोर ठेवून त्याचे महत्त्व सांगितले पाहिजेत ना की दुसऱ्या धर्माबद्दल आडवं तीडवं बोलून समाज द्वेष, धर्म द्वेष पसरला पाहिजे असे जे काय करतात तर आपल्यालाच प्रश्न पडतो की यांना बाहेरून धर्मा धर्मा मध्ये तेड,गैरसमज पसरवण्यासाठी पैसाअडका मिळतो की काय ?पण हे आपण स्वार्थासाठी आपली जन्मभूमी भारत भूमी तिच्याशी अन्याय करतो ते तसं झालं नाही पाहिजे भारतीय एकता साधली पाहिजे प्रत्येक धर्माला एक वेगळा सन्मान आहे तो सन्मान प्रत्येक धर्माला मिळाला पाहिजे त्याच विषयी ही कविता आपल्या सेवेसी लिहिली आहे कारण मला प्रेम आहे प्रथम माझ्या भारत देशाशी याविषयीच ही कविता स्फुरली गेली, आपल्या तमाम वाचकांच्या प्रेरणेनेच ही कविता स्फुरली गेली आपल्याला धन्यवाद आपण ही कविता वाचून भारत देशाची  एकता साधली पाहिजे तरच आपली येणारी पिढी आपल्याला धन्यवाद देईल!


Rate this content
Log in