STORYMIRROR

Latika Choudhary

Others

3  

Latika Choudhary

Others

तृण .... ती

तृण .... ती

1 min
13.9K


कधी तिला....

काळ्याशार...सकस...मऊ पोताच्या

लाडक्या जमिनीत ,मनात जागा जराही

गवसली नाही.......!

कारण.....

'ती'ला रुजवावे ,सिंचावे ,वाढवावे,

सजवावे वा गोंजारावे कुणा -कधी

वाटले नाही.....!

म्हणून.....

बिचाऱ्या 'ती'ला लाभली रखरखीत, 

 उजाड,वांझ भूमी 'दगड' धोंड्याची ....

जिथे कधी ओलावाच नाही......!

तरीही.....

शोधली ,गवसली जागा जराशी        

अशी-कौल, वृक्ष स्कंध वा फटीत 

पडक्या ,तडल्या भिंतीत,             

जेथे स्पेस...पाणीच नाही......!

मगनंतर....                   

अमुकच जागा,तमुकच ऋतू वा                 

हवीशी परिस्थिती ...पोज...

प्रतिबंध कधी ठेवलाच नाही . ....!

अशी ती....

'तृण'- मूठभर उंचीची...,

व्यापली वसुंधरा....

नटवली ,सजवली नाती....नाव....,

मग मागे कधी हटलीच नाही......!

कधी कधी....

भासतो थोडा थोडा ऋतूत मेघप्रसाद...

एरवी जगते चार थेंबावर दवाच्या...

जलाधार नाही.....!

आता तिची....

कुरकुर नाही, कापले...कुरतडले,

वा जाळले जरी...कारण सराव

सोस, साहणे ......

...मरतच नाही......!

आज मात्र ....घालते झुली 

डोंगराच्या पाठीवर....,             

बांधते मंदिर हिरवे...

पर्वत माथ्यावर ...आयुष्यावर....

हरलेच नाही......!


Rate this content
Log in