* त्रिमूर्तीस मानवंदना *
* त्रिमूर्तीस मानवंदना *
पुल,बाबूजी, गदिमांचा जन्मशताब्दी महोत्सव हा...
गीत संगीत अभिनयाचा
मंत्रमुग्ध फुलोरा हा !
संगीतातील योगदान असे हा समान धागा त्रिमूर्तींचा ...
साहित्य,संगीत कलेची दैवतं तुम्ही,
प्रणाम घ्यावा आम्हा सर्वांचा !
असामान्य कलाकर्तुत्व असे या सरस्वतीपुत्रांचा,
आधुनिक वाल्मिकी हा गौरव असे गदिमांचा !
साज चढऊनी संगीताचा, साथ दिधली बाबूजींनि..
लेखणीतून बहुआयामी साहित्य दिले पुलंनी !!
संगीतमय त्रिवेणी संगमात न्हाऊन निघालो सर्वजण...
मानवंदना देण्या त्यांना नतमस्तक होऊ आपण !!