STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

3  

Ramkrishna Nagargoje

Others

तरी

तरी

1 min
405

तरी

फांदीला आहेत, 

काटे तरी,

फुले किती गोजिरी.

काळा आहे ढग तरी,

त्याचे अंगी मोती.


मोर आहे,

नाचरा तरी,

आवाज त्याचा कसा,?

कोकीळ आहे,

काळा तरी,

मधुर त्याचा गळा.


रात्र आहे,

काळोखी तरी,

निद्रा बघ कशी.

झोपीच्या पोटी,

चैतन्याच्या राशी.


बाळ आहे, 

तहाने तरी,

मन बघ कसे,

खेळाला बाहुलीच्या,

बघुन हसे.


सोन्याची विट तरी,

तिला कोठे शोभा,

चमक मारतो,

दागिना तरी,

मन मोठे मोठे.


काच आहे तरी,

हिरा कशी होईल,

पैलू पाडताना,

घाव कसे सोशिल.


माणूस आहे तरी,

चेहरा हा फसवा,

मन बघ कसे,

जसा लोण्याचा गोळा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन