STORYMIRROR

Prashant Shinde

4  

Prashant Shinde

तोच चंद्रमा....!

तोच चंद्रमा....!

1 min
818


आज आकाशात सुपर मुनच आगमन ,एक दुर्लभ योगायोग आणि एक सुप्त आठवण....!!!!


चंद्रमा....!!!


तोच चंद्रमा नभात

तोच चंदा मामा

तोच चांदोबा

सार काही सांगायचे आजोबा


अजूनही आठवत मला

एक घास चिऊचा

एक घास काऊचा

एक घास माऊचा

सारा काही आटापिटा आज्जीचा


नंतर मात्र सार छु मंतर झालं

हळू हळू वय वाढलं

पान गळ झाली

मागे मात्र आठवणींचा

शिदोरी खजिना ठेऊन गेली


आतवर कोठेतरी

साक्षीला तो चन्द्र

आजही तसाच जिवंत आहे

कधीही दिसला तरी

तीच अवीट गोडीची आठवण जागवत आहे


आज छतावर पाहताना

मन माझं भरून आलं

कृपा छत्र आजोबा आज्जीच

इतकं मजबूत असत

ते मला प्रकर्षानं जाणवलं


उगाचच पाहता क्षणी

शीतल चंद्रान सुद्धा

माझ्या अंतःकर्णाला हेलावल

आतून सार बाहेर काढून

माझ्या डोळ्यांना मायेन पाणावल....!!!


Rate this content
Log in