तो पाऊस
तो पाऊस
1 min
194
त्या काळ्याश्या खडकातून
दरी पाण्याची वाहत होती
मी ही पाहत होतो,
अन ती ही पाहत होती....
ढगांचा गडगडाहट
सोबत पावसाची होती
हातात घेवून छत्री
ती समोरुन येत होती
ती स्वत:ला सावरत
चिखलाची बर्फी तुडवत होती
मी ही पाहत होतो,
अन ती ही पाहत होती...
एकमेकांच्या बघण्यात
प्रश्नांना पंख ही फुटले
स्मिताचे तोडून बंधन
ओठांना शब्द ही फुटले...
समजून एकमेकांना
नवी नाती जुळली होती
मी ही पाहत होतो,
अन ती ही पाहत होती...
