महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती
1 min
334
आमुची मायबोली मराठी
लावु तिचा टिळा ललाटी
हीच्या कोकणातील जल
सह्याद्रीच्या खोर्यातील शील
सर्व संताची या भुमी
नाही येथे काही कमी
येथील सण उत्सव अद्भुत
त्यांची कीर्ती संपूर्ण जगात
पुरुष स्री पोशाख निराळे
फेटा धोतर नि पैठणी साडी वेगळे
पंच पक्वान्नांचा खमंग वास
भरती पोट नि पुरण पोळीचा सुवास
येथे मराठी भाषेची विविधता
येथे विविध बोलींची दुविधा
अशी ही विविधता अजबच आहे
तशी ही संस्कृती गजबच आहे
