मराठी असे आमुची मायबोली
मराठी असे आमुची मायबोली
मराठी चा नेहमी ध्यास आहे
ती सुद्धा भाषेचा अभ्यास आहे
प्राकृतातुन तिचा येण्याचा आभास आहे
खरं तर आम्हां मायबोलीचा ध्यास आहे
संतानी ही केलेला तिचा विकास आहे
ओवी अभंग साहित्यातून तिचा प्रवास आहे
लेखक कवि मित्रांचा तो श्वास आहे
खरं तर आम्हां मायबोलीचा ध्यास आहे
मराठी राजभाषेचा आम्हां आस आहे
समाज प्रबोधनांची ती कास आहे
आधुनिकतेतून नष्ट होण्याचा तिचा वास आहे
खरं तर आम्हां मायबोलीचा ध्यास आहे
हल्ली इंग्रजी माध्यमामुळे तिचा उपवास आहे
न सांगता भविष्यातील तिचा वनवास आहे
कविता चारोळी गझलातून तिचा प्रकाश आहे
खरं तर आम्हां मायबोलीचा ध्यास आहे
