STORYMIRROR

Prashant Kadam

Others

3  

Prashant Kadam

Others

तो पाऊस !!

तो पाऊस !!

1 min
299

तो पाऊस जो नेहमीच खूप सूखावतो

जो उन्हाळ्यात तप्तते पासून वाचवतो

आल्हाद देणारा तो पहिला पाऊस

शांत संतत सतत असा बरसणारा

संपूर्ण सृष्टी हिरवीगार करणारा

चातुर्मासातील तो मनोहारी पाऊस

तो पाऊस खरच असतो सुखावणारा

मना मनांत नवं चैतन्य जागविणारा


तो पाऊस जो ढगफुटीत कोसळणारा

आक्रस्थाळेपणे येवून रौद्र रूप घेणारा

संकटाची चाहूल दाखविणारा असतो

महापूर,महामारी,ओला दुष्काळ आणतो

सर्वांनाच खूप भयभीत करणारा असतो

खरंच अगदी नको नकोसा वाटतो

कधी पडू नये, बरसू नये असच वाटतो

असा घाबरवून सोडणारा पाऊस असतो


तो पाऊस जो अवेळी अचानक बरसतो

तयार झालेल्या पिकांची नासाडी करतो

बळीराजाचे अतोनात नुकसान करतो

चाकरमानी ना अचानक येऊन भिजवतो

पूर्व आयोजित कार्यक्रमांची वाट लावतो

लहान थोर मंडळींची फजीती उडवतो

अशी ही पावसाची रुपे आपण अनुभवतो

कधी सुखावणारा, कधी घाबरवणारा, तर 

कधी फजीती करणारा तरी ही नेहमीच

हवा हवासा वाटणारा असतो तो पाऊस !


Rate this content
Log in