तो एक माणूस आहे...
तो एक माणूस आहे...
तो एक माणूस आहे
मानवी जीवनाचा हक्कदार आहे
पण.. काळोखाच्या उंबरठ्यावर बसुन
जीवनाचे पोवाडे गातो आहे...
तो एक माणूस आहे...
समोर काहीतरी कसलातरी
प्रकाश दिसतो आहे
संथ पडलेल्या नयनांना
पापण्याची उघडझेप भिस्त आहे
पण... चालताना तो धडपडत आहे
तो एक माणूस आहे...
कुठेतरी काहीतरी कसलातरी
आवाज येतो आहे...
शिथिल पडलेल्या कानांना
भाव पटलाचा कंप पावत आहे...
पण... खरं म्हणजे तो बहिरा आहे..
तो एक माणूस आहे....
अंधार प्रकाशाला झाकतो आहे...
प्रकाश अंधाराला उधळीत आहे
आणि ह्याच चक्रात तो फिरत आहे...
कारण तो एक माणूस आहे....
