तंत्रज्ञान हे वरदान...?
तंत्रज्ञान हे वरदान...?
तंत्रज्ञान हे वरदान आहे तस खरं,
पण याने खूप सारं नुकसानही
झालंय हेही तितकंच खरं.
माणूस माणसा पासून लांब गेला,
हाती जेव्हा टेलीफोन आला.
स्मार्टफोन ने तर समोरचा माणूसच
एकमेकांना दिसेनासा झाला.
गळ्यात-गळे,आणि हातावरच्या टाळ्या
आता काळाआड जाऊ लागल्या,
Online चॅटचा आता फॅड आलं.
पाण्यात बुडणाऱ्याला वाचवण्या ऐवजी
Video काढण्यात माणूस इथे दंग झालं.
चाळीत दाराजवळ दार असे,
प्रत्येकजण प्रत्येकाच्या
सुख-दुःखात सामील असे.
आता फ्लॅट आले,सगळेच कसे
बंद दाराआड विखुरले गेले.
जसे तंत्रज्ञानाचे तोटे आहेत
तसेच फायदे ही झाले म्हणा.....
दूर परदेशातल्या नातवाचे
तोंड पाहायला लाभले आज्जी-आजोबांना.
लेकाला ही शहरात शिकून
पहाता आले आई-बापाला.
सासुरवाशिणीलाही तोंडभरून
बोलता आले माहेराला.
तंत्रज्ञान हे वरदान वापरा पण
विचार करून हे ज्ञान.
