तमाशा कलावंत
तमाशा कलावंत
1 min
301
माणूसच असतो मनानं
देह असतो कलावंत ठेवीचा
तमाशा कलावंत तो जनाचा
खिळवतो तालात डोलात
फंडा आनंद पेरण्याचा
ध्यास उरी सुखाच्या घासाचा
कलावंत तो हाडाचा मानाचा
आयुष्याची कहाणी रचवता
तमाशाचाच तमाशा कधी
विरोधाची नि धैर्याची परीक्षा
खेळ नृत्य नाटक का वैरी
क्षण मायेचे नि प्रेमाचे देतो
भावनांचा मेळ घालणारे
अनेकार्थी उद्रेक कधी
कधी मनोरंजनाचा खेळ
जीवनप्रवास अनोखा वर्णी
