तळपशील सूर्या
तळपशील सूर्या
1 min
140
अता वागताना, विनयशील सूर्या
दरारा, स्वत:चा विसरशील सूर्या
कुणीही असे कोण आतंकवादी
लढुनी अरीला हरवशील सूर्या
विमानात तोही ढगाआड गेला
अरी त्यास भ्याला, पळवशील सूर्या
पराधीन ते युद्ध घनघोर झाले
कसे तावडीतून सुटशील सूर्या
धरी नेम आता अरीच्या विमाना
गिधाडा, नभाती पळवशील सूर्या
निशाणा अरीने, तुझा साधताही
जरी सापडे, तू तळपशील सूर्या
