तिलांजली
तिलांजली
1 min
158
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी
कधी नवी कधी जुनी
एका रिंगणाच्या आत
होते तिची आजीवनी
सारे सुख दुःख तिचे
घेते ओंजळ भरून
ठेवी मनाच्या कप्प्यात
गोड हसून घेऊन
तिचे सारे विश्व आहे
एका मर्यादेपर्यंत
जणू लक्ष्मणरेखाच
तिला मरणापर्यंत
काही स्वप्ने मनामध्ये
तिने पाहिले असता
देते तिलांजली त्यांना
इच्छा सर्वांची नसता
श्वास मोकळा घेण्यास
तिच्या इच्छा असतात
नाते ठेवण्या टिकून
मनी लुप्त पावतात
आई आजी ताई आत्या
किती रुपात असते
माया ममता वात्सल्य
लक्ष्मी मनात वसते
