प्रियकरपेक्षा पतीच भारी
प्रियकरपेक्षा पतीच भारी
सात जन्म साथ देण्याची
करुन खोटी मनाला आस
प्रियकर देतो प्रेयसीच्या
अंतर्मनात भावनिक फास
त्याला प्रेयसी म्हणजे
एक क्षणिक आनंद देणारी
त्याच्यासाठी रोज वेगवेगळ्या
रुपात बाहुलीसारखी नटणारी
प्रेमाचा करुन खेळ
तिला हातावर तो नाचवून
तिच्या मनाशी खेळतो
आपली घेतो इच्छा भागवून
पतीचे असे कधीच नसते
तो मनापासून प्रेम करतो
तिच्या इच्छा पूर्ण करुन
तिला जिवापाड तो जपतो
तिच्या आई-वडिलांना
आपलेच आई बाबा मानतो
तिच्या सुखदुःखाच्या वेळी
पदोपदी तिला साथ देतो
अशा नवऱ्याची पत्नी होणे
अहो भाग्य आहे पत्नीचे
प्रियकराच्या खोट्या प्रेमात
नुकसान होते प्रेयसीचे
