जन्म हा एकदाच आहे
जन्म हा एकदाच आहे
1 min
400
किती जरी येतील अडचणी
आनंदाने त्यावर करु मात
जन्म हा एकदाच आहे
दुःखांशी करु दोन हात
सुंदर दिलेले आयुष्य देवाने
जगूया आपण आनंदाने
सांभाळून सारी नाती गोती
राहू सारे सुख समाधानाने
दिन दुबळ्यांची करुन मदत
दुर करुन त्यांच्या अडचणी
त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणून
मिळवावी शांती आपल्या मनी
हे आयुष्य पुन्हा नाही
जगू आनंद पेरत सर्वत्र
पाठीमागे नाव निघावे
होता मनाचा धनवान पुत्र
