माहेर
माहेर
1 min
366
स्वप्नपूर्तीची आहे झालर
त्याला चांदणचुऱ्याचा आहेर
मनी वसे ते माझे सासर
दृष्ट लागावी असे माझे माहेर
माहेरवाशीण लेकीला
ओढ माहेराची असते
माहेरच्या या अंगणात
गोकुळ की हो नांदते
मनाच्या गाभाऱ्यात पूजनीय
माहेरच्या अपार आठवणी
आईबाबांच्या कुशीत वसलेल्या
कराव्या त्या अलवार साठवणी
सणासुदीचे दिवस आनंदाचे
माहेरी दिवस सजवायचे
आईच्या हाताची चवच न्यारी
आठवून डोळे हळूच पुसायचे
