मोबाईल
मोबाईल
1 min
410
बघता बघता कसे दिवस आले
महामारीने साऱ्या जगाला वेढले
होत्याचे नव्हते अचानक झाले
जवळचे लोक दुरावले गेले
कोणी कोणाला भेटू शकत नाही
कोणी कोणाजवळ जाऊ शकले नाही
माहेरची ओढ लागली माहेरवाशिणीला
आई-बाबांना ती भेटू शकली नाही
यावेळी होता एकच उपाय होता भेटण्याचा
मोबाईल वर व्हिडिओ कॉल करण्याचा
आई-बाबांना समोर बघताना
डोळे नकळतच पाणवले
नकळतच हातानी त्यांचे पाया पडले
मोबाईल द्वारे आशिर्वाद मोठ्यांचा मिळाला
माहेरवाशीण लेकीला आनंद मिळाला
भरभरून तिने मोबाईल फोनचे आभार मानले
खरंच तर आहे ही एक गोष्ट
मोबाईल...काळाची गरज आहे.
