मुलीला पण माना वंशाचा दिवा
मुलीला पण माना वंशाचा दिवा
1 min
313
वंशाचा दिवा मुलगाच
ही समजच मुळी चुकीची
मुलगा मुलगी एकसमान
मुलगी पण असते दिवा वंशाची
मुलीला वाढवा तिला शिकवा
तिचे तिला पायावर उभे राहू द्या
मुलगीच असते धनाची पेटी
तिच्या पंखाना बळ तुम्ही द्या
मुलगा मुलगी नको भेदभाव
दोन्ही लेकुरे आहेत आपलीच
दोघांना द्यावे समान वागणूक
बहरते अंगण आपले दोघांनीच
स्वच्छंदी जीवन आत्मज्ञानाचे
जगू दे आपले जीवन आनंदमय
घेऊ दे तिला आकाशी झेप
होऊ दे तिचे आयुष्य सुखमय
