मी गुलाब तू मोगरा
मी गुलाब तू मोगरा
1 min
292
गुलाबाच्या पाकळ्या
हळूहळू उमलताना
कळीचे रुप बदलले
दवबिंदूना झेलताना
साथ मोगऱ्याची
गुलाबाच्या सुगंधाला
मिलन होता दोघांचे
आसमंत दरवळला
काट्यावर ही बहरला
गुलाब हा टवटवीत
मोगरा फुलला वेलीवर
झाले अंगण आकर्षित
फुलांचा राजा गुलाब
रंग यांचे बहारदार
मोगऱ्याच्या गजऱ्यात
नववधू दिसे दिमाखदार
