आली माझ्या घरी ही दिवाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी
1 min
469
आली माझ्या घरी ही दिवाळी
उजळून निघाली ही धरणी सारी
हर्ष उल्हासाने ओंजळ भरूनी
दिव्या दिव्यांनी उजळून निघाली
अंगणी रांगोळी सजलेली
वृंदावनी तुळस ही बहरलेली
घेऊन आनंदाची पर्वणी
भरभरुनी सुख घेऊन आली
सुख समृद्धीची आरोग्याची
आली माझ्या घरी ही दिवाळी
फराळाच्या ताटानी सजलेली
आसमंत उजळून निघालेली
फटाक्यांची आतिषबाजी
लहानमोठ्यांच्या आनंदाची पर्वणी
आनंदाने साजरी करायची
आली माझ्या घरी ही दिवाळी
