तीन झोन
तीन झोन
कोरोनाने माजविले पृथ्वीवर थैमान
सरकारने काढले फर्मान
देशाचे केले तीन झोन
रेड, ऑरेंज, ग्रीन झोन
जिथे जास्त बाधित लोक
ते ठरले रेड झोन
त्यात केला कडक लॉक डाऊन
नाही कसली बेशिस्त सहन
जिथे बाधित मर्यादित
ते ठरले ऑरेंज झोन
त्यात थोडा शिथिल लॉक डाउन
आवश्यकतेनुसार घ्या फिरून
जिथे नाही कुणीही बाधित
ते ठरले ग्रीन झोन
त्यात ही आहे लॉक डाउन
नाही जास्त त्यांना बंधन
कोरोनाला घालविण्याचा हा आटापिटा
पाळा नियम झोनचे समजून
सरकारला करा मदत घरी बसून
तरच कोरोना जाईल पळून
