ती
ती
शितल जल तू,रानातील शीळ।
तलवारी धार,खरेपणा नाळ।।धृ।।
ललकारी बार,नैसर्गिक ध्यान।
विजयी पताका,गुढी उभी छान।।१।।
जया अंगी साधी,सरळ अभिमान
ययाती समृद्धी,ज्ञान रुपी दान।।२।।
पाणी ते निर्मळ,पवित्र झालं गा।
डेबू जन्मस्थळी,कळी फुलली गा।।३।।
वाजवी ते बोलं,वाजवी ती चालं
ढग स्मित कलं, सौज्वळ ती झुलं।।४।।
दिनकर भाग्य,सुख:द झालं गा।
वनमाळी सौख्य ,सह्द्यी भेटे गा।।५।।
सादगी मानीनी,सागरी भगिनी।
च्या कृपे कृष्णा ई,राधिका तृष्णाई।।६।।
शुभ आशिर्वाद , अभंग अभेद ।
भेटे भुपाळी पद, भजनाचा नाद।।७।।
इच्छा काही तरी,राधा ,मीरा जरी।
ती मित्र, सखी, रागिनी ती खरी।।८।।
