STORYMIRROR

Santosh Jadhav

Others

3  

Santosh Jadhav

Others

ती

ती

1 min
14.1K


सगळ्यांची ती 

अन् ती सध्या काय करते ?

असा प्रश्न 

माझ्याही तिच्याबद्दल येतोच मनात

ती अधे मधे 

दिसते हसते 

बसते 

बोलते 

पण ओझरतं 

तुटक 

आठवणीबद्दल

याच्याबद्दल 

त्याच्याबद्दल 

अन् जास्त 

माझ्याबद्दल 

तिचं छान चाललंय 

एवढं म्हणण्यापुरतं 

माझं बरं चाललयं 

आईचे गुडघे विचारते 

दारातली बाग

रस्ता 

पडलेली शाळा 

बालपणाच्या आठवणी 

बोलते मधेच 

मधेच 

तीचा स्वभाव विचारते 

जबाबदारी सांगते 

जबाबदारी काय आहे ती सांगते 

पाणी आणते 

पुसट 

कडा ओलावेपर्यंत 

बोलते 

हसते

पण 

खूप जपून 

लाजून 

मुक्त असं कांही 

तिला वागता येत नाही 

पण 

हळहळते 

माझ्याबद्दल अन् 

सगळ्या बालपणाबद्दल


Rate this content
Log in