ती
ती
1 min
241
ती माझी रेशीम धागा अन् मी त्याची सुई
कुठे फिरली नजर की टोचत राहते बाई
कामे आटोपून घेण्याची तिला फार घाई
पूर्ण न ऐकताच सदा पुढे पुढे निघून जाई
त्यामुळे मात्र दिवसभर माझा गोंधळ होई
थोडीशी भोळी अन् हळवी आहे ती लई
कोणाचे ही दुःख पाहून लगे रडवेली होई
सुखदुःखात नि संकटात ती सदा साथ देई
तिच्यामुळेच तर माझा संसार सुखाचा राही
तिच्या रेशीम धाग्याला माझी सोन्याची सुई
माझ्या अंगणात फुलल्या दोन जाई जुई
