ती ताराराणी
ती ताराराणी
शिवरायांची सुन लाडकी
ती ताराराणी
तलवारीने आपल्या मुघलांना
दाखविले पाणी
हंबीर रावांची कन्या ती तर
अग्नीची ज्वाला
तिचा करारी बाणा
समयी प्रत्ययास आला
संभाजी, राजाराम पडले
स्वराज्याचे नव्हते वाली
तोडून साऱ्या परंपरांना
ती झाली माता भद्रकाली
दिले प्रोत्साहन लोकांना
जनतेला सरदारांना
जातीने फिरुन सैन्यात
पेटविली आग मनात
वापरूनही गनिमी कावा
मोगलांचा मुल्क मारावा
झुंजेल तोवरी गड राखावा
जीवितहानी न करता सोडावा
अशा देऊनी सर्वा सूचना
लढण्याची बनविली योजना
गवतासही मग फुटले भाले
जन जन सारे योद्धे झाले
सात वर्षांचे संगर करुनी
औरंग्यास इथेच गाडले
अशी राणी ती ताराबाई
किर्ती करुनी गेली जगात
मराठ्यांच्या इतिहासात
अमर झाली सुवर्ण अक्षरात
