ती कविता
ती कविता
सल ती मनातली
कीती अन कसे भावली ती मला कविता ..
सखी शब्दात रचली का मी ती भवुकता ..
ओळअन् ओळ लिहिले भाव ते काव्यात
गुंफली ती सल मायेची ...... ती कविता..
जपली क्षणिक सुख मायेचा आगर ... ती कविता..
रोप लावलं मनी सकारते मूर्त ती कविता..
झुरते एकन्ती कधी सांज हिरवळीवरती ...ती कविता
खुणावते ती क्षितिजाची कोलाहल मनी..... ती कविता ..
कोण जाणे भावली कधी आसव सुमने ओंजळीतली ......ती कविता ..
भावुक मनी शब्द जाहले लेखणी जनी,...... ती कविता ..
अशी कुठे कशी सापडली मैत्र जीवाची सखी ....ती कविता ...
तृण दवबिंदू वा तरुण रात्र असे ,... ती कविता..
जाहली प्रिया कधी प्रेयसीची अबोल बोल ,..... ती कविता ..
गुंफली अशी मनी चित्त गुंतली जशी अशी , .... ती कविता..
झुल्यास ही झुलवे वरयासंगे दरवळेमधाळ वाणीत गुणगुणते, ..... ...... ती कविता..
अशीच भेटली सांज एकली क्षितिजास जणू ,....ती कविता .
.बहर येता फुलास प्रित बहरली........... ती कविता..
उन्माळा मनीचा तो लिहिला मी कधी....... ती कविता ..
काय सांगू कशी गवसली मज ही कविता..
भेटली माझ्यातच होऊन ती प्राण प्रभा
ती माझी कविता...
