ती झाशीवाली राणी
ती झाशीवाली राणी
1 min
134
ती झाशीवाली राणी
म्हणतात तिला मर्दानी
जणू शौर्यच मूर्तिमंत
ती स्वातंत्र्याची ज्योत
जणू ती तेजाची खाणी
स्वातंत्र्याची अभिमानी
जणू बसली ती यज्ञास
अर्पिला स्वतःचा श्वास
गोरा तो महिषासुर
मांडिले युद्ध दुर्धर
ती कालीमाता झाली
युद्धातच कामी आली
दश दिशे मांडीले संगर
अर्पिले स्वतःचे शिर
त्या युद्ध रुपी यज्ञात
दिली प्राणांची आहुती
ती कन्या महाराष्ट्राची
नेवाळकरांची कीर्ति
