STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

ती भेटली...म्हणून..!

ती भेटली...म्हणून..!

1 min
239

ती भेटली

आणि जीवन बदललं

अस प्रत्येकाच होत...


कोणाच जीवन

फुलून येत

कोणाच पार कोमेजून जात...


मी होते म्हणून

संसार झाला

हे प्रत्येकाला ऐकावं लागत...


तेंव्हा कोठे

संसाराचं गाड

पुढे सरकत.....


गाठी संसाराच्या 

म्हणे

स्वर्गात बांधल्या जातात...!


मग वाटते

त्या गाठी

इतक्या घट्ट का असतात...?


सत्व परीक्षाच

प्रत्येक क्षणी

प्रत्येकाला द्यावी लागते....


गाठीच सोडवत

जीवन खाली मुंडी घालून 

मुकाट जगावे लागते...


काही काही

खरेच 

नशीबवान असतात....


गाठी न सोडवताच

आपला संसार

आंनदाने रेटत असतात...


आशा नशिबवानांच्या पंगतीत

आपल्याला पण

एकदा तरी बसायचे असते...


म्हणून तर

तुझ ही राहू दे, माझ ही राहू दे

म्हणायचे असते....


ती भेटली म्हणून

जीवन सरले हे

मनोमनी जाणायचे....


चार पावलं 

चालता चालता

तुझंच बरोबर म्हणायचे असते...


सौख्य समाधान शांती साठी

जन्मोजन्मी इतकेच करायचे असते, 

तिचाच हात हातात आंनदाने धरायचे असते...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन