ती बदलतेय
ती बदलतेय
जसा काळ बदलला तशी ती ही बदलली.
आताशा कोणा समोर ती झुकत नाही.
सारी बंधने,साखळ्या तोडून ती जगते.
ती नटते,सजते स्वतः साठी,
आपला बिघडलेला बांधा ,स्वतःच निखरते.
पुन्हा पुन्हा स्वतःच्या रूपाच्या प्रेमात ती पडते.
आता शीळ पाक ती खात नाही.
स्वतः च्या आरोग्या कडे लक्ष देते.
त्याग बलिदान याच स्तोम ती माजवत नाही.
बाह्य रंगरूपा वरून ,स्वतःला कोणाला जोखु देत नाही.
स्वतःच सन्मान करते तिच्या सारख्या सख्यांच्या आंतरिक सौदर्याला.
ती समर्थ आहे, तिला कमी लेखू नका.
नऊ महिने स्वतः सोबत एक जीव ती वाढवते,
त्याही स्थितीत सगळं काम नीट पार पाडते.
आता तिला ही समजलय स्वतःच्या ,
इच्छा आकांक्षा नाही दाबून टाकायच्या.
चंग बांधला आहे तिने स्वतःला बदलवण्याचा
