STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

तिच्यामुळे मी

तिच्यामुळे मी

1 min
213


तिच्यामुळे मी लिहिते

ती मला देते नेहमी साथ।

भावना मनातल्या मांडत जाते

घेउनी माझा हातात हात।


कागदावर ती ,

अश्रू कधी गाळते।

कधी आसवे होऊन माझी

पापणीच्या काठावर थांबते।


सुखात दुःखात तीच

माझे मन जपत राहते।

अनोळखी आहे जगात मी

तिच्यामुळे ओळखीची होते।


शब्द शब्द मिळोनी सुंदर

वाक्य ती तयार करते।

अनोळखी या जगात ओळखीचे

नाव मला तीच कवी देते।


Rate this content
Log in