Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Others

4.0  

Rakesh More

Others

तिचं मन

तिचं मन

1 min
434


माझं मन सांगतंय तिचं मन 

आता माझ्याकडे येत आहे 

माझ्या अंतरीच्या भावनांना 

ती सिरियसली घेत आहे ||0||


कधी भिती वाटलीच नाही 

मला तिला गमावण्याची 

कधी स्पर्धा केलीच नाही 

तिच्या हृदयात मावण्याची 

तिच्या हृदयाशी माझ्या हृदयाचा 

संपर्कच आता थेट आहे

माझ्या अंतरीच्या भावनांना 

ती सिरियसली घेत आहे ||1||


तीच आहे या आसमंतात 

तिचाच आभास चराचरात 

तीच सतत असते सोबत 

तीच हृदयात तीच अंतरात 

हा रोमँटिक वाराही तिच्या

सुगंधाची आठवण देत आहे

माझ्या अंतरीच्या भावनांना 

ती सिरियसली घेत आहे ||2||


असं कसं होऊ शकतं 

माझं प्रेम तिला कळणार नाही 

जरासंही हृदय तिचं 

माझ्यासाठी हळहळणार नाही 

जिथे बघतो तिथे तिचा 

काहीतरी संकेत आहे 

माझ्या अंतरीच्या भावनांना 

ती सिरियसली घेत आहे ||3||


आता एकटं वाटत नाही 

तिचं अस्तित्व जाणवतं 

एक कोवळं स्वप्न मला 

प्रत्येक क्षणी खुणावतं 

असं वाटतं जशी ती 

घट्ट माझ्या कवेत आहे 

माझ्या अंतरीच्या भावनांना 

ती सिरियसली घेत आहे ||4||


तिची आठवण सुखद आहे 

तिचा विरह जोडतो मला 

तोडत नाही कधी मला 

तिच्याकडे ओढतो मला 

स्पर्शून जातोय मला आता 

तिचाच श्वास हवेत आहे 

माझ्या अंतरीच्या भावनांना 

ती सिरियसली घेत आहे ||5||


Rate this content
Log in