तिची व्यथा
तिची व्यथा
1 min
572
आभाळ तिच्या हक्काचं
अजुनही काळवंडलेलं
मळभ दूर सारण्या
तिनं आयुष्य वेचलेलं...
काटे वाटेवरती तिच्या
आपल्यांनीच विखुरलेले
घायाळ मन आणि
रक्तबंबाळ तिची पावले...
दाहक स्पर्श तो नजरेचा
फेडत जातो लज्जा वसन
अत्याचाराच्या सरणावर
तिचं रोजचंच मरण...
नात्यांच्या जंजाळात
नेहमीच गृहीत धरलेली...
रूढी परंपरेच्या खोट्या
भ्रमात ती लुटलेली...
बीज नव्या उद्याचं
तिच्या गर्भात रुजलेलं...
त्याच कुंभात तिचं
आयुष्य संपवलेलं...
