Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Others

4  

Manisha Wandhare

Others

तिचे हक्क

तिचे हक्क

1 min
548


तुझ्या हिशेबात कधी गणले का रे तिचे हक्क ,

तीने स्वखुशीने दिले तु मोजले का रे तिचे हक्क ...


मायाळू मनाला पडलेले सुंदर स्वप्न ममतेचे ,

केले काळजाचे तुकडे मागले ना तिने तिचे हक्क ...


राधेच्या डोळ्यातून अश्रुधारा बरसत होत्या ,

वृंदावन सोडतांना सोबत घेऊन गेला तो तिचे हक्क ...


हक्कांचा तिच्या पारिजातच झाला कधीचा ,

गंधाळते पलीकडच्या अंगणात तेच तिचे हक्क ...


कुणाला मागणार ती हक्क विभागले तिला,

कोणता कुठे आहे सारेच अनोळखी तिचे हक्क ..


Rate this content
Log in