STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

थेंब

थेंब

1 min
201

मेघातून येणाऱ्या थेंबा

कोठे पडशील रे?

रानमळ्यातल्या पानांवर,

मोती तू होशील का?


मेघातून येणाऱ्या थेंबा

कोठे पडशील रे?

पडशील मातीत,तापल्या,

सुगंध देवुन मातीला.

सुगंध तू होशील का?


मेघातून येणाऱ्या थेंबा

कोठे पडशील रे?

फुलात घेऊन रुप लहान,

पाकळीवर बसशील का?


मेघातून येणाऱ्या थेंबा

कोठे पडशील रे?

नद्या सरोवरे येथे,

तू पडशील जरी,

पाणीच, तू होशील का?


मेघातून येणाऱ्या थेंबा,

कोठे पडशील रे?

ढगाला सोडताना,

ढगास तू काय 

सांगशील बरे?


ढग होऊन आकाशीचा,

या मातीत तू येशील का?

हिरवी हिरवी वने, आणि

पशूपक्षांची तहान तू,

होशील का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन