ते मन असते...
ते मन असते...
1 min
166
ज्याला सगळे समजते पण, निर्णय घेऊ शकत नाही. ते मन असते.
सगळी सुख-दु:ख
स्वत: जवळ साठवून ठेवते, ते मन असते.
कित्येक मान -अपमान सहन करुन
ठेवते. ते मन असते.
कुणावर तरी जीवापाड, स्वत:
पेक्षा जास्त प्ररम करते.
ते मन असते.
जीवापाड प्रेम करुन कुणाच्यातरी भितीने
किंवा काही तरी अडचणी मुुुळे
व्यक्त होऊ शकत नाही. ते मन असते.
मारापेक्षा एखाद्याचे टोचून बोलणे
ज्याला जास्त लागते. ते मन असते.
लोक म्हणतात मनात एक आणि तोंंडावर एक
हो हे खरच असते. कारण ते मन असते.!