STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

ताई

ताई

1 min
251

नाही संपली सगळी नाती, तरी आता मार्ग मोकळा.

सहवासा नंतर सुरू झाला, पुन्हा नवा सोहळा.


ताई म्हनू की आई, वा मारू नावाने हाक.

 दादा असून मी स्वतः, तूझ्या दादागिरी चा धास.


घरी असलो दोघं आपन, तर कधी नाही पटायचं.

नसलीस तेव्हा मात्र, मन आठवणींनीं भरून यायचं.


भांडलो आपन कित्येकदा, कधी कधी रडायचोही.

साध्या साध्या विनोदावर, पोट भरून हसायचोही.


कधी भिती कधी पाठिंबा, कधी कौतूक तर कधी राग.

नेमकी आजच त्या स्वप्नाला, का यावी जाग.


आज चा दिवस महत्वाचा, बाकी आयुष्य जगण्याची घाई.

आज सासरी गेली, माझ्या समोर माझी ताई.


साहित्याला गुण द्या
लॉग इन