स्वयंपूर्ण खेडी हाच भारताचा आरसा
स्वयंपूर्ण खेडी हाच भारताचा आरसा
ग्रामीण भारतात खरे लोक जीवन!
सौख्य, शांति व आरोग्यदायी जीवन!!
बंधूभाव,समता,प्रेम व सहकार!
ग्रामीण लोकजीवनाचे मुलाधार!!
दिखाऊपणा,अहंभाव शहरात असता!
ग्रामीण भारताचा जाई ह्रुदयातून रस्ता!!
अभावातही ठेवी टिकवून संस्कृती!
स्वार्थामूळे शहरात रुजली विकृती!!
शेजार कोणआले,गेले कळतं तरी का?
खेड्यात एकाकीपण तरी सलतं का?
पंचायतराजचा जर भारतात सुधारेल दर्जा !
खेडी सक्षमीकरणाने पूर्ण होतील सा-या गरजा!!
ग्रामीण भारताचा होईल विकास !
स्वयंपूर्ण खेडी नसतील भकास!!
आरसा भारतात दाखवतील खेडी!
शहराकडे धावणारी ठरतील वेडी!!
