STORYMIRROR

Meena Mahindrakar

Others

3  

Meena Mahindrakar

Others

स्वयंपाक घराची शान

स्वयंपाक घराची शान

1 min
11.5K

लज्जत ती वाढे जेवणाची

भाज्या असो वा लोणचे खार

मसाल्याच्या ह्या पदार्थांनीच

भारताची किर्ती नेली साता समुद्रापार


        समुद्राने दिले दान आम्हा

        हे खारे खारे मीठ

        खावे ज्याचे अन्न

        राहावे त्याच्याशी नीट


रंग आणती पदार्थांना

गुण तिचा रोगप्रतिबंध

बहुगुणी अशी हळद ही

स्त्रियांच्या कपाळाचा गंध


        खोकल्याची औषध ही 

        तिखट गोड दालचिनी

         उग्र असे स्वाद तिचा

         पण आहे खूप बहुगुणी


काळी, पांढरी, लाल 

कलरफुल ही मीरी

चवीला असते तिखट

पण स्वाद वाढवते भारी


        मसाल्याचे पदार्थ हे

        स्वयंपाक घराची शान

        कोरोनावर प्रतिबंधक

        म्हणूनही यांना मान


Rate this content
Log in