STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

सव्वीस एप्रिल(26)

सव्वीस एप्रिल(26)

1 min
11.6K

बारावा दिवस अक्षय तृतीयेचा....!

बाबा म्हणाले आज अक्षय तृतीया

राबणाऱ्या हातांसाठी उत्तम मुहूर्त

वाटल तर नवीन कामाची सुरुवात

दिवस चांगला म्हणून आजच कर....

वरण भात त्यावर तुपाची धार

लिंबू काकडी खीर कोशिंबीर

सांडगे पापड मस्त वडे आंबोडे बटाटा भाजी

कटाची आमटी गरम पुरणपोळी ताजी ताजी...

सणावाराला सात्विक जेवणाचा थाट

बसायला असतो सुंदर पाट

पूजा अर्चा साग्र संगीत नैवेद्य आरती

पोटाची होते मग नुसती भरती...

आज ही हे सारं असच झालं

म्हंटल देवा मन माझं का रे खाल्लं

तसा अंतरात तो आपसूक प्रकटला

म्हणाला जेव निवांत तू बाळा

अजून तरी उपाशी पोटी कोणी न राहिला..

संकट काळी घास अडतो प्रेमाचा

हाच संस्कार आहे आपल्या मातीचा

संकल्प केलाय निधड्या छातीचा

निप्पात करू आम्ही नक्की कोरोनाचा....!

शुभ दिवस..!


Rate this content
Log in