स्वत्व
स्वत्व
1 min
408
नक्षत्रांनो मळभ आले म्हणून उजळायचे थांबू नका
निर्झरांनो कातळ मध्ये म्हणून उसळायचे थांबू नका
सुमनांनो वादळ आले म्हणून उधळायचे थांबू नका
सुगंधांनो धुम्मस मध्ये म्हणून तरळायचे थांबू नका
काजव्यांनो पाऊसकाळ म्हणून चमकायचे थांबू नका
आपले मौलिकत्व विपरीत स्थितीतही कधी सोडू नका
आली वेळ निघून जाते स्वत्व आपले इथे जपून ठेवा
हतप्रभ क्षण आले जरी आशेचे किरण अडवू नका
