स्वतंत्रता दिन
स्वतंत्रता दिन
1 min
523
जुलमी राजवट झुगारून
परकीय गुलामगिरी नाकारून
देशासाठी त्या सुपुत्रांनी
प्राणार्पण केले त्यांना वंदन ।।1।।
असो ऊन असो वारा
तमा नाही तयांना
देशाच्या रक्षणासाठी तत्पर
अशा नमन त्या सैनिक जणांना।।2।।
सुजलाम सुफलाम
अशी अमुची भारत माता
अभिमान असे आम्हाला तिचा
गोडवा असे मुखावर अमुच्या तीचा ।।3।।
